अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली शनिवार पेठ येथील किराणा दुकानात अवैध गुटखा विक्री करणाऱ्यावर लक्ष्मीपुरी पोलिस आणि अन्न औषध प्रशासनाने संयुक्तपणे धाड टाकून कारवाई केली. शनिवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. दुकानातून पाच हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त करुन दुकानमालक जुबेर मलिक बागवान (वय ३२) याला ताब्यात घेण्यात आले.
किराणा माल दुकानात अवैध गुटखा विक्री करत असल्याची माहिती लक्ष्मीपुरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक अनिल गुजर यांनी ही माहिती अन्न व औषध प्रशासनाला दिली. त्यासाठी दोन पथके तैनात करण्यात आली. त्यावेळी दुकानात गुटखा विक्री करत असल्याचे दिसले. त्याच्या दुकानातून ५ हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला.
किराणा दुकानावर छापा पाच हजाराचा गुटखा जप्त