विनाकारण शनिवारी रस्त्यावर फिरणाऱ्या २९३ वाहनांवर कारवाई करुन ५९ हजार रुपयांचा दंड पोलिसांनी वसूल केला. त्यांची वाहने पंधरा दिवसांसाठी ताब्यात घेण्यात आली. तर होमक्वॉरंटाइनचा भंग केल्याप्रकरणी ११ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात होम क्वॉरंटाइनचा भंग केल्याप्रकरणी ११ गुन्हे दाखल करण्यात आले. इचलकरंजी पोलिस ठाण्यात गजानन पाटील (इचलकरंजी), कुमार शिंदे (रा. माणकापूर), राजारामपुरी पोलिस ठाण्यात हुसेन शेख (वय २४, रा. कनाननगर ), करवीर पोलिस ठाण्यात तगव्वा कुरबल (५०, पारकर गल्ली, पाचगाव), किरण राजगिरे (माळवाडी, पाचगाव), कल्लाप्पा वेडबेलकर (रा. शिक्षक कॉलनी, पाचगाव), गंगा वेडबेलकर यांच्यावर गुन्हे दाखल झाले.
पन्हाळा पोलिस ठाण्यात सतीश लगारे (२३, रा. कणेरी कोतोली, ता. पन्हाळा), शाहूवाडीत तानाजी गुजर (२७, रा. शिरगाव, ता. शाहूवाडी), विश्वजीत खबाले (२१, रा. हारुगडेवाडी, ता. शाहूवाडी), राधानगरीत दत्तात्रय दळवी (२७, रा. पडळी, ता. राधानगरी), योगेश पाटील (३१, रा. पडळी) यांच्यावर गु्न्हा दाखल करण्यात आला. दरम्यान गेल्या बारा दिवसांत अडीच हजारांहून अधिक वाहनधारकांवर गुन्हे दाखल केले आहेत. शनिवारच्या कारवाईत करवीर तालुक्यात ४०, कागलमध्ये ५०, गांधीनगरात ३५, गोकुळ शिरगाव ७, इस्पुर्लीमध्ये २, शाहूवाडी ३९ , पन्हाळा ५, राधानगरी ५, कळे ४, इचलकरंजी ८, कुरुंदवाड २०, हुपरी ११ ,शिरोळ ३८ , हातकणंगले २, गडहिंग्लज १५ इचलकरंजी शहर वाहतूक शाखेत ६० जणांवर कारवाई झाली. जिल्ह्यात बेकायदेशीर मद्याची वाहतूक, साठा करणाऱ्या १० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
होमक्वॉरंटाइनचा भंग; अकरा जणांवर गुन्हे दाखल