करोनाविरुद्धच्या लढ्यासाठी रविवारी जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले होते. जवळपास १४ तास नागरिक घरीच राहिले. या काळात अनेक खेळाडूंनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले होते. गेल्या काही दिवासांपासून भारतीय क्रिकेटपटू करोना विरुद्धच्या लढ्यासाठी सोशल मीडियावरून आवाहन करत आहेत. याच सचिन तेंडुलकरपासून ते विराट कोहलीपर्यंत अनेकांचा समावेश होता. आता भारताच्या एका क्रिकेटपटूने करोनाविरुद्धच्या लढ्यावर एक गाणं म्हटलं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
करोनाविरुद्ध लढ्यासाठी क्रिकेटपटूचे रॅप साँग